जळगाव: महाआरोग्य सप्ताहात २,९०० रुग्णांची तपासणी

आरोग्य हीच खरी संपत्ती: पालकमंत्री

बातमी शेअर करा...

जळगाव: महाआरोग्य सप्ताहात २,९०० रुग्णांची तपासणी

आरोग्य हीच खरी संपत्ती: पालकमंत्री

जळगाव ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती प्रत्येकाच्या दारात पोहोचली पाहिजे,’ असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आरोग्य संजीवनी अभियानांतर्गत महा आरोग्य सप्ताहाचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले. २,९०० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आणि गरजू रुग्णांना तज्ञ उपचार घेण्याची संधी मिळाली.

या आठवड्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. गावनिहाय तपासणी खालीलप्रमाणे करण्यात आली: पालधी ४८६, चवणे – ३८७, म्हसावद – ११२, भोकर २९७, पिंपरी खुर्द – ३९४, धरणगाव – १९२, शिरसोली – ५५२ आणि नशिराबाद १२९, एकूण २९०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.विशेषतः आजच्या पालधी शिबिरात, कांताई नेत्रालयाचे डॉ. बेग यांच्या मार्गदर्शनाखाली १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३८ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

शाहू महाराज रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे तज्ज्ञ डॉ. भारुडे आणि त्यांचे सहकारी डॉ. कृष्णा वाघमारे यांच्या पथकाने हृदयरोगाच्या ६९ रुग्णांची तपासणी केली, त्यापैकी १३ रुग्णांना अँजिओग्राफीची आवश्यकता असल्याचे आढळून आले. आठवडाभरात एकूण ४२ रुग्णांना अँजिओग्राफी तपासणीसाठी शिफारस करण्यात आली आहे.कर्करोग तपासणीसाठी १०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये २ मॅमोग्राफी चाचण्या आणि १२ पॅप स्मीअर चाचण्यांचा समावेश होता. यामध्ये रेडिओलॉजिस्ट डॉ. स्वप्नील मोरे आणि डॉ. बच्छाव यांनी मौल्यवान योगदान दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम