जळगाव महानगरपालिकेत वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन कार्यक्रम यशस्वी

रिड्यूस, रीसायकल आणि रियुज तत्वावर मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

जळगाव महानगरपालिकेत वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन कार्यक्रम यशस्वी
रिड्यूस, रीसायकल आणि रियुज तत्वावर मार्गदर्शन
जळगाव | जळगाव महानगरपालिकेच्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त “पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा” या संकल्पनेवर आधारित वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यशाळेत श्रुतकीर्ती महाजन यांनी उपस्थितांना “3 आर” – रिड्यूस, रीसायकल आणि रियुज या मूलभूत तत्वांवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, घरापासून स्वच्छतेची सुरुवात केली तर कचरा आणि प्लास्टिकमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करता येईल. तसेच, पाण्याचा कमीत कमी वापर व त्याचे पुनर्वापर याबाबतही सखोल माहिती PPT च्या माध्यमातून दिली.

पर्यावरण दूत डॉ. लीना पाटील यांनी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापनात कार्यरत कर्मचाऱ्यांचे मोफत वैद्यकीय तपासणी त्यांच्या दवाखान्यात केली जाणार आहे.

कार्यक्रमात पर्यावरण प्रेमी धीरज राजपूत, अजिंक्य तोतला, मदन लाठी आणि अन्य सहकाऱ्यांनी आपले विचार मांडले.

महानगरपालिका आणि पर्यावरण दूत गेल्या चार महिन्यांपासून “माझे शहर, माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छता आणि हरितीकरणाची जनजागृती करत आहेत. प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करून, झाडे लावून, आणि प्लास्टिकचा कमी वापर करून जळगाव शहराला आदर्श बनवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील यांनी केले. व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, उपायुक्त (पर्यावरण) पंकज गोसावी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते श्रुतकीर्ती महाजन यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमास महानगरपालिकेचे कर्मचारी, पर्यावरण दूत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम