जळगाव महापालिकेत बनावट जन्मदाखल्यांचा पर्दाफाश

लवकरच गुन्हे दाखल होणार

बातमी शेअर करा...

जळगाव महापालिकेत बनावट जन्मदाखल्यांचा पर्दाफाश

लवकरच गुन्हे दाखल होणार

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट जन्मदाखल्यांची मोठी प्रकरणे उघडकीस आली आहेत. फेब्रुवारी महिन्यातच ५० हून अधिक प्रकरणे दाखल झाली होती. मात्र, यातील ४३ दाखले संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले असून, महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड यांनी याची माहिती तहसीलदारांना दिली.

तहसीलदार शितल राजपूत यांनी सांगितले की, ४३ बनावट जन्मदाखल्यांची छाननी अंतिम टप्प्यात आहे. तपास पूर्ण होताच, आज किंवा उद्या गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात यापूर्वीही रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे जळगाव प्रकरणातही बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मागील ६ महिन्यांतील सर्व जन्म-मृत्यू दाखल्यांचे रेकॉर्ड तपासणीसाठी घेतले तहसीलदार कार्यालयाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, लवकरच जबाबदारांवर कारवाई होणार आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम