जळगाव येथे अवैध सावकारीवर कारवाई

बातमी शेअर करा...

जळगाव येथे अवैध सावकारीवर कारवाई
जळगाव : शहरात परवाना न घेता अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारीनुसार सहकार विभागाने धाड टाकून नुकतीच कारवाई केली. प्राप्त तक्रारीवरून मनोज लिलाधर वाणी व कल्पना मनोज वाणी (रा. श्रीकृष्ण कॉलनी, गणेश कॉलनीजवळ, जळगाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ अन्वये कारवाई करण्यात आली. धाडीत तीन सौदा पावती व नऊ खरेदीखत असे महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले.
ही कारवाई सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलिस बंदोबस्तासह पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रकरणी चौकशी सुरू असून पुढील तपास उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका यांच्या पातळीवर होणार आहे. या कारवाईत उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी अंमलबजावणी केली. पथकात सहाय्यक निबंधक महेश कासार (भडगाव), सहकारी अधिकारी आर. आर. पाटील, वरिष्ठ लिपिक विक्रांत म्हस्के, प्रिया कराळे तसेच सहकारी अधिकारी फकिरा तडवी (रावेर) यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम