
जळगाव येथे ओबीसी एल्गार महामेळा
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व ओबीसी नेते . छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी एल्गार महामेळा जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक मेळाव्यास जळगाव शहरातील विविध १६ महिला संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. महिलांनी रिक्षा आणि बाईक रॅलीद्वारे प्रचार आणि जनजागृती करत मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या प्रसंगी महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि भविष्यात मदतीचे आश्वासन दिले.
अखिल भारतीय समता परिषदेच्या विभागीय संघटक निवेदिता ताठे यांच्या पुढाकाराने महिलांच्या शिष्टमंडळाने भुजबळ साहेबांची भेट घेतली.
सहभागी महिला संघटना: – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला संस्था , बाराबलुतेदार संघटना , आक्रमक संघटना , राजपूत महिला मंच , शिंपी समाज महिला संघटना , हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट , नर्मदा गो संस्था , महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ , आस्था बहुउद्देशीय सामाजिक संघटना , सारांश फाऊंडेशन , सप्तरेणु बहुउद्देशीय संस्था ,शक्ति फाउंडेशन, पिंक ऑटो, नारी शक्ती संघटना , बीजेपी महिला आघाडी
या वेळी निवेदिता ताठे, स्मिता वेद, मंदाताई सोनवणे, भारती म्हस्के, नीलू ताई इंगळे, भारती काळे, विजया पांडे, मीना महाजन, रत्ना शिंपी, सपना राजपूत, भारती कुमावत, रंजना सपकाळे, मीना कोळी, छाया सारस्वत, योगिता शुक्ला, कविता इंगळे, स्नेहा सोनवणे, शोभा कोळी, संगीता सपकाळे, स्मिता कोहली, विद्या सोनार, भाग्यश्री सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम