
जळगाव रेल्वे प्लॅटफार्मवर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
जळगाव रेल्वे प्लॅटफार्मवर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
जळगाव : रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म नं. ५ / ६ वर एक ६० वर्षांचा अनोळखी पुरुष आढळून आला होता. त्या अनोळखी व्यक्तीला औषधोपचार कामी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मयत व्यक्तीच्या अंगात निळसर रंगाचे मळकट शर्ट, हिरवी लुंगी, केस पाढरे वाढलेले, दाढी बारीक वाढलेली, शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा असे मयताचे वर्णन आहे. सदर अनोळखी मयताची ओळख पटली नसून व त्यांचा मृतदेह ओळख पटवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवण्यात आले आहे, त्यामुळे नागरिकांनी ओळख पटवण्यासाठी पुढे यावे, असे आवान जळगाव रेल्वे पोलिसांकडून तपास अधिकारी पोहेकॉ रविंद्र एस. पाटील यांनी केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम