जळगाव वकील संघ निवडणूक: अॅड. सागर चित्रे यांची अध्यक्षपदावर दमदार बाजी; १०१ मतांनी विजय

बातमी शेअर करा...

जळगाव वकील संघ निवडणूक: अॅड. सागर चित्रे यांची अध्यक्षपदावर दमदार बाजी; १०१ मतांनी विजय

अॅड. स्मिता झाल्टे (उपाध्यक्ष), अॅड. विरेंद्र पाटील (सचिव), अॅड. लीना म्हस्के (सहसचिव), अॅड. प्रवीण चित्ते (कोषाध्यक्ष) यांचीही विजयी घौडदौड

जळगाव – जळगाव जिल्हा वकील संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अॅड. सागर चित्रे यांनी अध्यक्षपदावर जोरदार विजय मिळवताना १०१ मतांच्या फरकाने बाजी मारली. त्यांनी अॅड. संजय राणे यांचा ४५४ विरुद्ध ३५३ अशा मतांनी पराभव केला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोषात विजयी उमेदवारांचे स्वागत केले.

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी अॅड. स्मिता झाल्टे, सचिवपदी अॅड. विरेंद्र पाटील, सहसचिवपदी अॅड. लीना म्हस्के तर कोषाध्यक्षपदी अॅड. प्रवीण चित्ते हे विजयी झाले. निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली.

जिल्हा वकील संघाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. एकूण ३६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील तीन अर्ज छाननीवेळी नामंजूर झाले, तर महिला सदस्यांच्या दोन जागांसाठी केवळ दोनच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या बिनविरोध निवडल्या गेल्या. उर्वरित १३ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते.

मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १,०१० मतदारांपैकी ८८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेचारनंतर मतमोजणीला सुरुवात झाली आणि रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती.

बिनविरोध निवड झालेल्या महिला सदस्य

महिला सदस्यपदासाठी अॅड. शारदा सोनवणे व अॅड. कल्पना शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. अॅड. वर्षा पाटील यांनी अर्ज नामंजुरीविरोधात अपील दाखल केले होते; मात्र ते अपिल फेटाळण्यात आले. त्यामुळे केवळ दोन अर्ज शिल्लक राहिल्याने दोनही उमेदवार बिनविरोध निवडले गेले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम