
जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती देण्याची केंद्राकडे मागणी – खासदार स्मिता वाघ
जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती देण्याची केंद्राकडे मागणी – खासदार स्मिता वाघ
वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना
जळगाव जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.
खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहराच्या मुख्य मार्गांवर वाढत चाललेला ट्रॅफिक, अपघातांचा धोका आणि प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क व कृषी व्यापाराला मोठी चालना मिळण्यासाठी रिंग रोडची उभारणी अत्यावश्यक झाली आहे.रिंग रोड झाल्यास शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच शहरात येणाऱ्या बाह्य वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रस्तावासाठी डिपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करण्याची आणि रिंग रोडला केंद्राच्या प्रमुख पायाभूत सुविधा योजनांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. तांत्रिक सर्वेक्षण व वाहतूक तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे हा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
रिंग रोडसाठी सुचवलेले महत्वाचे महामार्ग जोडमार्ग NH-53 (सूरत – नागपूर मार्ग),NH-753F (बूरहानपूर – औरंगाबाद मार्ग),NH-753J (जळगाव – चाळीसगाव मार्ग) तसेच प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) व आंतर-जिल्हा मार्ग असतील “जळगावचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम असून रिंग रोड झाल्यास वाहतूक, उद्योग, सुरक्षा आणि आर्थिक प्रवाहात मोठे परिवर्तन घडेल. शहराला याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम