
जळगाव शहरात दिवसाढवळ्या मोबाईल चोरी
जळगाव शहरात दिवसाढवळ्या मोबाईल चोरी
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरात चोरट्यांनी दिवसाढवळ्या शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शहरातील एका मंगल कार्यालयाच्या पाठीमागील भागात कामासाठी आलेल्या दिनेश उत्तम सूर्यवंशी (वय ५३) यांच्या खिशातून सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
माहितीनुसार, शिव कॉलनी येथे राहणारे सूर्यवंशी दुपारी कामासाठी आले होते. गर्दीचा फायदा घेत किंवा अन्य कोणत्या मार्गाने चोरट्याने त्यांचा महागडा मोबाईल पॅन्टच्या खिशातून चोरीला नेला.
घटना लक्षात येताच सूर्यवंशी यांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु मोबाईल किंवा चोरट्याचा काहीही मागोवा लागला नाही. अखेर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम