जळगाव शहरात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; रामानंद नगर पोलिसांत गुन्हे दाखल

बातमी शेअर करा...

जळगाव शहरात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; रामानंद नगर पोलिसांत गुन्हे दाखल

जळगाव ;- जळगाव शहरात २१ ऑगस्ट २०२५ रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, उपनिरीक्षक संजय तडवी यांच्याकडून तपास सुरू आहे.

शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी २१ ऑगस्ट रोजी सकाळी घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु ती मिळून न आल्याने त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्याच दिवशी, मू. जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु ती आढळून न आल्याने त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणीही अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम