
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला
सात जणांना घेतले जावे, मनपाने बंदोबस्त करण्याची मागणी
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला
सात जणांना घेतले चावे, मनपाने बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी | जळगाव
गोलाणी मार्केटसमोर सात जणांचा चावा घेतल्याची घटना ताजी असताना रविवार व सोमवारी पुन्हा अयोध्यानगरात सहा जणांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. मनपा प्रशासनाकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण व पकडण्याच्या संदर्भात केवळ निविदा प्रक्रीया सुरू असल्याचे उत्तर मिळते आहे. तृप्ती कॉर्नर भागातील नऊ वर्षाच्या साई वाघ या बालकाच्या पायाला तीन ठिकाणी चावा घेत फाडले आहे. शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची समस्या वर्षभरात प्रचंड वाढली आहे. रविवारी जिल्हा रूग्णालयात कुत्रा चावल्याने उपचारासाठी आलेल्या २७ रूग्णांपैकी २० जण शहरातील होते. तर सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत उपचारासाठी आलेल्या १६ पैकी १३ जण शहरातील होते. यावरून शहरात मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. रविवारी २० पैकी ८ तर सोमवारी १३पैकी ५ मुले ही १५ वर्षाखालील आहेत. अयोध्यानगरातील तृप्ती कॉर्नरजवळील साई शेखर वाघ (वय ९) हा बालक घराच्या कंपाउंडमध्ये ओट्यावर बसलेला असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला.
यांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा उत्तर सुरवाडे (वय ७४), सारीका सुरवाडे (वय ७), रिया शिंदे (वय दीड वर्ष), दर्शीका पवार (वय ३), शगुन राजपूत (वय १४) व साई शेखर वाघ (वय ९) असे कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींची नावे आहेत. हे सर्व

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम