जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे आज शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

बातमी शेअर करा...

जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे आज शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

जळगाव : जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता बंधूच्या पाल्यांना व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज दि. १५ रविवार रोजी केमिस्ट भवन येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जैन इरिगेशन मीडिया प्रमुख

अनिल जोशी, जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष सुनील भंगाळे, समाजसेवक शाम कोगटा, त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज चेअरमन मनोज पाटील उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम स्थळी वृत्तपत्र विक्रेत्या बंधू व पाल्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी, उपाध्यक्ष नितीन चौधरी, सचिव विजय कोतकर, रवींद्र जोशी, गोपाळ चौधरी व पदाधिकारी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम