जळगाव जिल्ह्यातील 136 विद्यार्थ्यांनी तीन दिवसीय संसदेत नोंदविला सहभाग

बातमी शेअर करा...

 

14 वी भारतीय छात्र संसद उत्साहात संपन्न
जळगाव जिल्ह्यातील 136 विद्यार्थ्यांनी तीन दिवसीय संसदेत नोंदविला सहभाग

जळगाव प्रतिनिधी

8 ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे भारतीय छात्र संसदच्या 14 व्या अधिवेशनाचे यशस्वीरित्या आयोजन संपन्न झाले. आयुष्यभर साधी जीवनशैली आत्मसात करून, वाटचाल करणारे राजकारणी देशात कमी आहे. सत्ता म्हणजे अहंकार करणे नाही,

 

तर तो लोकांसाठी कामे करण्याचा आणि समस्या सोडविण्याचा एक मार्ग आहे, हे लक्षात घेऊन काम करणारे लोकप्रतिनिधी यशस्वी होतात, असे मत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी उद्घाटनपर कार्यक्रमात व्यक्त केले. भारतीय छात्र संसदच्या 14 व्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवाकल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्रसिंग तोमर, उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतिश महाना, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी, हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदिपसिंग पठाणीया, मेघालय विधानसभेचे अध्यक्ष थॉमस संगमा, बिहर विधानसभेचे अध्यक्ष अवधेश नारायणसिंग, खासदार राजकुमार रोत, खासदार ए. ए. रहीम, बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रविंद्रनाथ महातो, काँग्रेसचे मिडीया आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, खासदार अरूण गोविल, प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर, काँग्रेस नेते डॉ. कन्हैय्या कुमार, राज्यसभा टिव्हीचे माजी कार्यकारी संचालक राजेश बादल, बोट कंपनीचे सहसंस्थापक आणि उद्योजक अमन गुप्ता, एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहूल कराड, कुलगूरू डॉ. आर. एम. चिटणीस आदि मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये ४ सत्रे आयोजित केली गेली होती. संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे :
सत्र १ : भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर.
सत्र २ : रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार
सत्र ३ : भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी
सत्र ४ : एआय आणि सोशल मिडिया : सामर्थ्य की अनपेक्षित संकट
या तीन दिवसीय छात्र संसदेत देशभरातील ४५० विद्यापीठातील ८००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील १३६ विद्यार्थ्यांनी भारतीय छात्र संसदचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम