जळगाव शहर विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांना व्यापाऱ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद
व्यापारी आणि शेतकरी वर्गाच्या समस्या सोडवण्याचे डॉ. सोनवणे यांचे आश्वासन
जळगाव शहर विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांना व्यापाऱ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद
व्यापारी आणि शेतकरी वर्गाच्या समस्या सोडवण्याचे डॉ. सोनवणे यांचे आश्वासन
जळगाव बाजार समितीत डॉ. सोनवणे यांचा थेट संवाद आणि सकारात्मक प्रतिसाद
जळगांव / प्रतिनिधी
जळगाव शहर विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी प्रचारादरम्यान जळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान व्यापाऱ्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
व्यापारी वर्गाच्या समस्या समजून घेत, त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या हितासाठी बाजार समितीच्या व्यवस्थेत सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. सोनवणे म्हणाले, “बाजार समिती ही फक्त व्यापारासाठी नसून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एकत्रितपणे करण्यासाठी आहे. त्यांच्या समस्या सोडवणे ही माझी प्राथमिकता असेल.”
प्रचारादरम्यान त्यांनी व्यापाऱ्यांशी थेट चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
डॉ. अश्विन सोनवणे यांचा हा संवाद त्यांच्या प्रचाराला अधिक बळकटी देणारा ठरला असून, व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता निर्माण झाली आहे.
आगामी निवडणुकीत त्यांचा हा जनसंपर्क किती प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा👇
विकासाचा महामेरू, अवघा तालुका विस्तारू – माजी आ. प्रा. चंद्रकांतजी सोनवणे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम