
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘निरोगी माता आणि सुदृढ बालक’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी चा उपक्रम
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘निरोगी माता आणि सुदृढ बालक’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी चा उपक्रम
जळगाव ;- जागतिक आरोग्य दिन प्रतिवर्षी ७ एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने यावर्षी भारत सरकारने “सशक्त सुरुवात आशादायी भविष्य” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवली आहे. या संकल्पनेनुसार यावर्षी संपूर्ण भारतभर मातृत्व आणि नवजात बाळांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा सोमवार दिनांक ७ एप्रिल रोजी सकाळी ठीक १० वाजता आनंदयात्री योग हॉलमध्ये जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानामध्ये न्यू लाईफ हॉस्पिटल जळगाव येथील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. रुपाली बेंडाळे ‘निरोगी माता आणि सुदृढ बालक’ या विषयावर मार्गदर्शन आणि शंका समाधान करणार आहेत.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि नि:शुल्क आहे. उत्तम मातृत्व आणि सुदृढ बालक याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी या जाहीर व्याख्यानाचा सर्व वयोगटातील माता भगिनिंनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे आणि सोहम् योग चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सोहम् योग विभाग मू. जे. महाविद्यालय येथे किंवा प्रा. ज्योती वाघ ८७९३४२१७९७ किंवा प्रा. पंकज खाजबागे ८०८०१०४३१७ यांचेशी संपर्क साधावा. असे आयोजकांनी कळवले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम