जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, गोळाफेक, बॉल थ्रो, सूर्यनमस्कार, चमचा-लिंबू शर्यत, संगीत खुर्ची आणि योगासने यांचा समावेश

बातमी शेअर करा...

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, गोळाफेक, बॉल थ्रो, सूर्यनमस्कार, चमचा-लिंबू शर्यत, संगीत खुर्ची आणि योगासने यांचा समावेश

 

जळगाव प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, गोळाफेक, बॉल थ्रो, सूर्यनमस्कार, चमचा-लिंबू शर्यत, संगीत खुर्ची आणि योगासने यांचा समावेश होता. चार वयोगटांत या स्पर्धा घेण्यात आल्या.

*सन्माननीय उपस्थिती आणि पारितोषिक वितरण*

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास सद्गुरू भक्तराज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. भारती चौधरी, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनल इंगळे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी नेहा देशमुख, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश जाधव, विभागीय महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, आंतरराष्ट्रीय योगा पंच डॉ. अनिता पाटील, राज्य योगा क्रीडामार्गदर्शक श्रीमती चंचल माळी, क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. प्रत्येक क्रीडा प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

*विशेष सन्मान आणि आयोजन समिती*

विशेष सन्मान म्हणून नाशिक ते लेह-लडाख सायकल मोहीम पूर्ण करणाऱ्या सौ. कामिनी धांडे, वेटरन राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू सौ. छाया तायडे आणि सोनल विचवेकर यांचा सत्कार करण्यात आला.

या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी व शिक्षकांनी विशेष योगदान दिले. मुख्याध्यापिका सौ. कांचन नारखेडे, सौ. चारुशीला पाटील, सौ. जयश्री माळी, सौ. सरस्वती ढाके, सौ. समिधा सोवनी, प्रा. शालिनी तायडे, सौ. विजया चौधरी, डॉ. कांचन विसपुते, कु. श्वेता कोळी, श्रीमती धनश्री सोनी यांनी पंच व आयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कांचन विसपुते यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत केले, तर आभारप्रदर्शन सौ. समिधा सोवनी यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम