
जागतिक महिला दिन जिल्हाधिकारी कार्यालयात होणार साजरा
महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
जागतिक महिला दिन जिल्हाधिकारी कार्यालयात होणार साजरा
महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
जळगाव: -महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत महिला सक्षमीकरण आणि प्रशासन सुधारणा यासंदर्भात विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ०८ मार्च २०२५ रोजी जागतिक करण्यात आले आहे.
यात ई-ऑफिस प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-ऑफिस प्रणाली’ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि डिजिटल कार्यप्रणालीला गती देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही कार्यशाळा दुपारी ११:३० ते १:०० यावेळेत राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण लिंक https://tinyurl.com/EofficeJalgaon, https://www.youtube.com/@jalgaondm या आहेत.
‘ई-ऑफिस प्रणाली’ ही कागदविरहित आणि वेगवान प्रशासनासाठी एक महत्त्वाची संकल्पना आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना डिजिटल कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, डिजिटल यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे शासकीय निर्णय प्रक्रियेतील गती वाढणार आहे.
या विशेष उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिला अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम