
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आशा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आशा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
जळगाव – जागतिक स्तनपान सप्ताह २०२५ च्या निमित्ताने येथील आयएमए हॉल मध्ये आशा कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप, डॉ. विलास भोळे, जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भारत बोरोले, डॉ. चंद्रशेखर सिकची यांची प्रमुख उपस्थिती होती .
कार्यशाळेचे आयोजन जळगाव स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली चौधरी, सचिव डॉ. अनिता बाविस्कर आणि जळगाव बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती जोशी, सचिव डॉ. मनोज चौधरी यांच्या सहकार्याने करण्यात आले.
आशा कार्यकर्त्यांना स्तनपानाबाबत संवेदनशील करणे, जेणेकरून त्या गरोदरपणाच्या काळापासूनच मातांना सल्ला देऊ शकतील, स्तनपानाला प्रोत्साहन करतील हा कार्यशाळेचा उद्देश होता.
उद्घाटन सत्रात डॉ. रमेश धापते, डॉ. विजय घोलप, डॉ. विलास भोळे डॉ. शशिकांत गाजरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत डॉ. प्रीती जोशी, डॉ. शीतल भोसले आणि डॉ. माजिद खान यांनी संवादात्मक सत्र घेतले. स्तनपानाचे महत्त्व, तंत्र, योग्य स्थिती, व स्तनपान करतांना येणाऱ्या सामान्य अडचणी आणि त्यावर उपाय या विषयांवर सखोल चर्चा झाली.
गोल्डन अवरचे महत्त्व आणि कोलोस्ट्रम (चिक) — ज्याला “लिक्विड गोल्ड” असेही म्हणतात — याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. स्तनपानासाठी बाळाची व आईची योग्य स्थिती आणि योग्य पकड (लॅचिंग) याचे प्रतिकृतींवर प्रात्यक्षिक ही घेण्यात आले.
समारोपात डॉ. वैशाली चौधरी यांनी सारांश मांडून, आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या भागात खरी स्तनपान प्रवर्तक होण्यासाठी प्रेरित केले.
प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. प्रीती जोशी यांनी मातांना समर्पित अमृतपान ही कविता सादर केली. सूत्रसंचालन डॉ. रूपाली पाटील यांनी केले.
डॉ. सारिका पाटील, डॉ. पूनम दुसाने, डॉ. भावना चौधरी, डॉ. दिप्ती नेहेते, डॉ. संजीवनी चौधरी, डॉ. अविनाश भोसले, डॉ. अविनाश खेलवाडे आणि डॉ.अमित नारखेडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम