
जातीय सलोखा वृध्दींगत होण्यासाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चढवली मौला अली बाबा दर्ग्यांवर चादर
जातीय सलोखा वृध्दींगत होण्यासाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चढवली मौला अली बाबा दर्ग्यांवर चादर
खामगाव ः- तालुक्यातील घारोड येथे मौला अली बाबा यांची पुरातन दर्गा असुन ही दर्गा अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दि.06 जुलै 2025 रोजी मोहरम निमित्त घारोड गावातुन मौला अली बाबा यांच्या दर्ग्यापर्यंत संदन काढण्यात आली. याप्रसंगी
खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घारोड येथे जावुन मौला अली बाबा यांच्या पवित्र दर्ग्यावर चादर चढविली. गावामध्ये सर्व समाज गुण्या गोविंदाने राहुन जातीय सलोखा वृध्दींगत होवुन सर्वत्र सुख,शांती नांदावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,मनोज वानखडे, घारोड ग्राम पंचायतचे सरपंच वैभव ठाकरे, उपसरपंच भिकाजी इंगोले, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शेख मुक्तार,लाखनवाडाचे माजी सरपंच शेख फीरोज खान,सलीम खान, फयाज टेलर, शेख खलील, शेख हारुण,शेख रहिम, मजील बाबा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे घारोड येथे आगमन झाले असता ढोल ताश्यांच्या निनादात ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांनी शाल व पुष्पगुच्छ देवुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह सर्व मान्यवरांचा सत्कार केला.यावेळी शाहबाज खान पठान,ग्राम पंचायत सदस्य अक्षय मानवतकर,भगवान बोरे, शेख हसन,दिलावर खान पठान,रहेमन खान पठान, शेख चाँद शेख इमाम, बाबुराव इंगोले, केशव दुतोंडे,आनंदा दुतोंडे यांच्यासह घारोड येथील हिंदु-मुस्लीम समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम