
जादूटोण्याच्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; अमळनेरात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
जादूटोण्याच्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; अमळनेरात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) – “मोगरा देवीची शक्ती अंगात आहे, तुझ्या घरातील लक्ष्मी प्रसन्न नाही, त्यामुळे मुलाचे लग्न जमत नाही” असा बहाणा करून पैसे दुप्पट करून देणे, सोन्याचे दागिने व घागरी काढून देण्याचे आमिष दाखवत शहरातील बंगाली फाईल भागातील एका महिलेने तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित महिलेविरुद्ध जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामवाडीतील राजेंद्र नारायण माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या आई भटाबाई माळी यांना मंदिरात भेटलेल्या मंगलबाई बापू पवार या महिलेने देवीची शक्ती असल्याचा दावा करत वेगवेगळ्या बहाण्यांनी लाखो रुपये घेतले. फेब्रुवारी ते जून या कालावधीत कधी सोन्याच्या घागरी, तर कधी देवीचा मुखवटा दाखवून साडेचार लाख, साडेतीन लाख, अडीच लाख अशा हप्त्यांमध्ये पैसे मागवून घेतले. शेवटी ८० हजार रुपये घेताना घरच्यांनी आरशातून तिला स्वतःच्या साडीत पैसे लपवताना पाहिले. त्यानंतर धान्याच्या कोठीत ठेवलेले पैसे गायब असल्याचे उघड झाले आणि फसवणूक प्रकरण समोर आले.
या प्रकरणी पो.उ.नि. समाधान गायकवाड तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम