जानवेच्या तरुणाला अवैध दारूची वाहतूक करताना अटक

बातमी शेअर करा...

जानवेच्या तरुणाला अवैध दारूची वाहतूक करताना अटक

अमळनेर : बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करून विक्रीसाठी : नेणाऱ्या जानवे येथील तरुणाला रडीवायएसपी पथकाने पकडून र त्याच्याकडून मोटरसायकलसह ४३ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि.५ रोजी सायंकाळी साडे चार वाजता अमळनेर धुळे रोडवर घडली.

डीवायएसपी विनायक । कोते याना जानवे येथील तरुण निलेश अशोक पाटील (वय २५) 5 हा मोटरसायकलवर अवैध रित्या दारू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस नाईक । प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश 5 पाटील, शेखर साळुंखे याना रवाना केले. पोलिसांनी धुळे रोडवर एचपी 1 गॅस गोडाऊन जवळ निलेश अशोक पाटील राजानवे याला त्याची मोटर सायकल क्रमांक एम. एच

१९ सी.एच.६३६५ सोबत अडवले. मोटरसायकलवर चार झोल्यांमध्ये देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. निलेशकडे दारू बाळगणे अथवा विक्रीचा परवाना नव्हता व विक्रीसाठी जानवे येथे नेत होता. पोलिसांनी दारूसह मोटर सायकल असा ४३ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हितेश बेहरे यांच्या फिर्यादीवरून निलेश विरुद्ध मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम ६५ (अ), भारतीय न्याय संहिता कलम ४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम