जानेवारीत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास शंभर टक्के शास्ती माफ
जळगाव मनपा प्रशासनाने शास्ती माफीची अभय योजना लागू
जानेवारीत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास शंभर टक्के शास्ती माफ
जळगाव मनपा प्रशासनाने शास्ती माफीची अभय योजना लागू
जळगाव
शहरातील मालमत्ता थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा यासाठी जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर शास्ती माफीची अभय योजना दि.१ जानेवारीपासून सुरू केलेली आहे. ही अभय योजना दि.१५ मार्च २०२५ पर्यंत सुरु राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जळगाव शहरातील मालमत्ता धारकांकडे असलेली थकबाकी वसुली कामी जळगाव मनपा प्रशासनाने शास्ती माफीची अभय योजना लागू केल्यापासून ४ कोटी ७० लाख २२ हजार ८३५ रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी केला आहे. तसेच थकबाकीदारांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा यासाठी मनपा प्रशासनाने शासकीय
सुट्टीच्या दिवशी देखील १.३० वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालय सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांना मालमत्ता कर व पाणी पट्टीची थकबाकी भरावी अन्यथ नळ कनेक्शन कट करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अभय योजनेअंतर्गत थकबाकी भरणाऱ्या मालमत्ता धारकांना जानेवारी महिन्यात १०० टक्के शास्ती (दंड) माफ करण्यात येणार असून फेब्रुवारीत ९० टक्के तर मार्च महिन्यात ७५ टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातच थकबाकी भरून १०० टक्के शास्ती माफीचा लाभ थकबाकीदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम