जामठीतील आठवडे बाजारात दोन गटात हाणामारी

बातमी शेअर करा...

जामठीतील आठवडे बाजारात दोन गटात हाणामारी

बोदवड : तालुक्यातील जामठी येथील आठवडे बाजारात शनिवारी दोन गटात जबर हाणामारी झाली असून या प्रकरणी बोदवड पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामठी येथे शनिवारी मार्केट यार्डमध्ये गुरांच्या बाजारात शेळ्यांची वसुली पावती न फाडल्याच्या किरकोळ कारणावरून मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालण्यात आली. या वेळी जामठीतील युवक अजय उत्तम पाटील हा भांडण सोडवण्यास गेला. या युवकाचा राग धरून बेटावर खुर्द येथील चार युवकांनी अजय पाटील याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला, तर इतर तीघांनी काठीने मारहाण करुन त्यांना जखमी केले.

दरम्यान, जखमी अजय पाटील यांच्या भावांना ही माहिती कळताच ते सर्व घटनास्थळी पोहोचले. तोवर ते सर्व तेथून पसार झाले होते. तर जखमी अजयला बोदवड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, बेटावद खुर्द येथील हे नागरिक महिन्या-दोन महिन्यातून मारामारी व व्यापाऱ्यांना नहाक त्रास देऊन त्यांची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे.

तर पोलीस प्रशासनाने या संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील व्यापारी करत आहेत. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम