जामनेर तालुक्यातील २२ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

बातमी शेअर करा...

जामनेर तालुक्यातील २२ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचा पुढाकार

जळगाव (प्रतिनिधी): येथील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने जामनेर तालुक्यातील २२ रुग्णांवर मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना आवश्यक औषधोपचार देत पुढील काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले.

जामनेर तालुक्यातील काही रुग्णांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची तातडीची गरज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी रामदास पाटील यांनी पुढाकार घेत या सर्व रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.

या शस्त्रक्रिया डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. विवेक सोलंकी, डॉ. मयुरेश डोंगरे आदी डॉक्टरांनी पार पाडल्या. त्यांना परिचारिका सुनिता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, वैष्णवी डांदगे, हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण उपचार प्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम