जामनेर तालुक्यात भाजपला मोठा धक्का; पहुर येथील असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा...

जामनेर तालुक्यात भाजपला मोठा धक्का; पहुर येथील असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहुर येथील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जळगाव येथे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जाहीर प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी दिली आहे.

आज सायंकाळी सहा वाजता जळगाव शहरातील जिल्हा शिवसेना कार्यालयात हा प्रवेश सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी शिवसेनेचे उपनेते व रावेर-नंदुरबार जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दिपकसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाजपचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, रवींद्र बारी, रविंद्र राऊत, अतुल राऊत, रवींद्र जाधव, पुंडलिक घोंगडे, हर्षल घोंगडे, शुभम घोंगडे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे जामनेर तालुक्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या हस्ते या सर्वांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. याप्रसंगी सुकलाल बारी, अशोक जाधव, उपजिल्हा संघटक गणेश पांढरे, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, माजी शहर संघटक राजेंद्र पाटील, विजय राठोड, विजय बादल, प्रितम शिंदे, बापू मेणे, भाऊराव गोंधनखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे शिवसेनेला तालुक्यात नवे बळ मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम