जामनेर तालुक्यात सापदंशाने महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा...

जामनेर तालुक्यात सापदंशाने महिलेचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे अंगण आवरत असताना विषारी सापाने दंश केल्याने जयश्री शरद मगर (वय ३८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता घडली.

जयश्री मगर या पती शरद मगर (शेतमजूर) व दोन मुलांसह गोंडखेल येथे राहत होत्या. मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे अंगणातील कोपऱ्यात पडलेली थैली उचलताना कोब्रा सापाने त्यांच्या उजव्या हाताला दंश केला. तातडीने जामनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर प्रथमोपचार करून त्यांना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

चार दिवस अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या वेळी नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. घटनेमुळे गोंडखेल गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम