
जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा भाजपची सत्ता
जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा भाजपची सत्ता
ना. गिरीष महाजन यांचे वर्चस्व कायम
जामनेर /प्रतिनिधी – जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिमाखात फडकला असून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत तब्बल २३ जागा मिळवुन नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालाने जामनेरच्या राजकारणात ना. गिरीष महाजन यांचा वरचष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून त्यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वासाची मोहोर उमटवली आहे.
या निवडणुकीत जामनेरच्या जनतेने विकासकामांना प्राधान्य देत मतदान केले. सुरुवाती पासुनच भाजपला यश मिळाले नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार व माजी नगराध्यक्षा साधना महाजन या आधिच बिनविरोध निवडून आल्या होत्या तसेच सपना रवींद्र झाल्टे, श्रीराम महाजन, पुजा सुभाष पवार, संध्या जितेंद्र पाटील, मुकुंदा सुरवाडे, उज्ज्वला दिपक तायडे, डॉ. प्रशांत भोंडे, महेंद बाविस्कर व किलुबाई शेवाळे या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या आहेत. व झालेल्या निवडणुकीत दत्तु जोहरे, बाबुराव हिवराळे, माधुरी कचरे, वेनुबाई माळी, पिंजारी मुन्नी हसन, बेगम सईदा युनुस, तेजस पाटील, शितल माळी, आतिश झाल्टे, प्रतिभा पाटील, सुहास पाटील, निलिमा पाटील, सुरेखा पाटील, या भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत. तर जावेद अब्दुल रशिद, सालेहा इरफान शाह, बतुल बी कुरेशी, परवीन बानो नाजिम, या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गटाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. मागील काळात शहरातील रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान, ड्रेनेज व्यवस्था, वीज पुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक विकास आणि नागरी सोयीसुविधांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचा थेट फायदा नागरिकांना झाला. याच विकासकामांची पावती म्हणून जनतेने भाजपाला पुन्हा संधी दिली आहे.
ना. गिरीष महाजन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जामनेर शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रशासनावर असलेली पकड, समस्यांवर तत्काळ तोडगा आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळेच त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप, टीका आणि राजकारणाला जामनेरच्या जनतेने स्पष्टपणे नाकारले असून काम करणाऱ्या नेतृत्वालाच आपली पसंती दिली आहे. हा विजय म्हणजे केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नसून विकासाच्या राजकारणाचा मोठा कौल असल्याचे मानले जात आहे.
भाजपाच्या या विजयामुळे शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि जल्लोष करत आनंद साजरा केला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि ना. गिरीष महाजन यांच्या प्रभावी नेतृत्वाचा असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
पुन्हा एकदा भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे जामनेरच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत. जामनेर नगरपरिषदेवरील हा विजय म्हणजे ना. गिरीष महाजन यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेली ठाम शिक्कामोर्तब असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम