जामनेर नगरपरिषदेवर भाजपचे  वर्चस्व: साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा

बातमी शेअर करा...

जामनेर नगरपरिषदेवर भाजपचे  वर्चस्व: साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा

८ जागा बिनविरोध, शहरात उत्सवाचे वातावरण

जामनेर – जामनेर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व घडामोड घडली असून साधना महाजन यांची नगराध्यक्षा पदावर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज न केल्याने ही निवड सुरुवातीपासूनच निष्पन्न झाली. शहरात ही राजकीय घटना उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव, ढोल-ताशांचा गजर आणि मिठाई वाटपाने वातावरण उत्सवी झाले.

यंदाच्या निवडणुकीत तब्बल ८ नगरसेवक पदेही बिनविरोध ठरल्याने जामनेरच्या राजकीय इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला आहे. विविध प्रभागांमध्ये आपापसात झालेल्या सहमतीमुळे स्पर्धा टाळली गेली आणि संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरातील नागरिकांनीही या बिनविरोध वातावरणाचे स्वागत केले आहे.

गिरीष महाजन यांच्या रणनीतीची निर्णायक छाप

साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीमागे ना. गिरीष महाजन यांचे सूक्ष्म नियोजन आणि प्रभावी समन्वय ठळकपणे जाणवतो. शहरातील विविध गटांना एकत्र आणणे, संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी संवाद साधणे आणि विकासाधिष्ठित सहमती निर्माण करणे – ही सर्व कामे त्यांनी सहजतेने पार पाडल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

त्यांच्या हस्तक्षेपामुळेच अनेक प्रभागांतील उमेदवारांमध्ये समंजसपणा निर्माण झाला आणि ६ प्रभाग बिनविरोध राहिले. साधना महाजन यांचा अर्जही याच वातावरणात भक्कम ठरला आणि अखेर त्यांची बिनविरोध निवड साकारली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम