जामनेर न्यायालयातील सहायक अधीक्षक महेश उदर यांच्या निलंबनाची मागणी

बातमी शेअर करा...

जामनेर न्यायालयातील सहायक अधीक्षक महेश उदर यांच्या निलंबनाची मागणी

जिल्हा एकता संघटनेचे जिल्हा न्यायालयाला निवेदन

जळगाव – जामनेर न्यायालयातील सहायक अधीक्षक महेश हरी उदर यांच्याविरुद्ध गंभीर अनियमिततेचे आरोप करीत जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा न्यायालयात तक्रार अर्ज सादर केला. गुन्हा क्रमांक 288/2025 मधील तपासादरम्यान पीडितांच्या अधिकारांचे जाणीवपूर्वक हनन करण्यात आले असून आरोपींना फायदा मिळेल असा न्यायप्रक्रियेचा गैरवापर झाल्याचा आरोप संघटनेने नोंदवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान करून चुकीची माहिती देणे, चार्जशीट स्वीकारण्यास विलंब करणे आणि न्यायकारभारात व्यत्यय आणण्याचे गंभीर मुद्दे निवेदनात अधोरेखित करण्यात आले.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, मयत सुलेमान यांचे वडील रहीम खान यांचे हक्क बाधित झाल्याने आणि तपासातील विलंबामुळे आरोपींना डिफॉल्ट बेलचा अनुचित लाभ मिळाल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आवश्यक आहे. बीएनएस 216, 217 आणि 218 कलमानुसार न्यायप्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे, कर्तव्यच्युती करणे आणि आरोपींना मदत होईल असा हेतूपुरस्सर गैरवापर केल्याचे आरोप उदर यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

एकता संघटनेने न्यायालयीन प्रशासनाकडे उदर यांना तात्काळ निलंबित करण्याची, विभागीय चौकशी सुरू करण्याची आणि त्यांच्या भूमिकेची गुन्हेगारी जबाबदारी निश्‍चित करण्याची मागणी केली आहे. पीडितांना न्याय मिळणे हे न्यायालयाचे प्रथम कर्तव्य असून प्रशासकीय निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले. तक्रार सादर करताना फारुक शेख यांनी सांगितले की, “आम्ही दबावात येणार नाही. पीडितांसाठी शेवटपर्यंत लढणार. प्रशासन झोपेत असेल तर आम्ही त्यांना नक्की जागे करू.”

तक्रार सादरीकरणासाठी राहिम खा, मेहबूब खा, फारुक शेख, अनिस शहा, अनवर सिकलगार, आरिफ देशमुख, मतीन पटेल, मजहर खान, युसुफ पठाण, मेहबूब पठाण, अ‍ॅड. आमिर शेख, अ‍ॅड. रईस बागवान, अ‍ॅड. सलीम शेख, अ‍ॅड. नुसरून फातिमा, शेरा भाई तसेच जामनेरचे जावेद मुल्लाजी आणि अशफाक पटेल आदींच्या शिष्टमंडळाचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम