जामनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

सामरोद / प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील सामरोद गावातील 14 वर्षीय मुलाची अपहरण झाल्याची घटना घडली असून जामनेर पोलीस स्टेशन ला अपहरणाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे जामनेर तालुक्यातील सामरोद येथील सचिन मारोती पेठे वय- 14 रा.सामरोद हा मुलगा रोजच्या प्रमाणे स्वतःची घरची गाई – गुरे चारण्यासाठी समरोद शिवारात , आमखेडा शिवारात , तळेगाव शिवारात जात असे.सचिन हा दि. 11 नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी 10 वाजता सामरोद च्या शिवारातील जंगलात गुरे चारून येतो असे सांगून घरून निघून गेला.सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत तो काही घरी आला नाही. तर त्याच्या नातेवाईकांनी शोधासोध शुरु केली.तसेच इतर नातेवाईकांकडे फोन लावून विचारपूस केली तरी काही तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी दि. 12 नोव्हेंबर रोजी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन ला जाऊन मुलाला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असा प्रकारचा गुन्हा भा.द.वि. कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. सचिन पाटील करित आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम