जिंदगी फाउंडेशन कडून आयोजित ‘सावित्रीबाई फातिमा जिजाऊ जयंती सप्ताह’ उत्साहात
665 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेमध्ये भाग
जिंदगी फाउंडेशन कडून आयोजित ‘सावित्रीबाई फातिमा जिजाऊ जयंती सप्ताह’ उत्साहात
665 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेमध्ये भाग
जळगाव प्रतिनिधी ;- जिंदगी फाउंडेशन कडून ‘सावित्रीबाई फातिमा जिजाऊ जयंती सप्ताह’ जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावित्रीबाई यांच्यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. 665 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. लहान आणि मोठ्या गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. लहान गटामध्ये कृष्णा पाटील याने प्रथम क्रमांक, अश्विनी देवरे हिने द्वितीय क्रमांक, ऋतुजा रणसिंग हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर खुशी सपकाळे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
मोठ्या गटामध्ये नव्या भंगाळे हिने प्रथम क्रमांक, जान्हवी पाटील हिने द्वितीय क्रमांक, रोहित कुमावत याने तृतीय क्रमांक पटकावला तर दिपाली भोंडे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. उमेर तांबोळी याला विशेष प्रेरणादायी पुरस्कार मिळाला.
त्यासोबत 50 सर्वोत्तम निबंध लिहणाऱ्या विद्यार्थ्यांना जिजाऊ चरित्र भेट देण्यात आले तसेच सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले.
जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, सचिव अजय पाटील आणि राज्यस्तरीय जलतरणपटू अमोल गोमटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. ए. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, शारीरिक शिक्षक महेश ठाकरे, ग्रंथपाल समाधान पाटील आणि शिक्षकेतर कर्मचारी मनीष पाटील यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघ यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम