जिकरा शाळेत राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा.

बातमी शेअर करा...

जिकरा शाळेत राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा.
जामनेर /प्रतिनिधी –

जामनेर शहरातील जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा उर्दू प्राथमिक शाळेत अल्पसंख्याक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शेख रहीम व सचिव जाकिर शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समाजातील विविध अल्पसंख्याक घटकांचे हक्क, त्यांचे योगदान व सामाजिक सलोखा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अल्पसंख्याक समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरणाऱ्या विचारांनी झाली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी अल्पसंख्याक दिनाचे महत्त्व विशद करत भारतातील विविध संस्कृती, भाषा व परंपरांची समृद्धता विद्यार्थ्यांसमोर मांडली. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे निबंध अधोरेखित केले. तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. मुरलीधर कासार यांनी जिकरा शाळेला भेट देऊन आपल्या विचारमंथनातून मत व्यक्त केले. सर्व धर्म, समाज व जातींमध्ये परस्पर सन्मान, बंधुभाव व सहकार्याची भावना वाढीस लागावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. त्याच प्रमाणे विविधतेत एकता हीच भारताची खरी ओळख असल्याचे पो. नि. मुरलीधर कासार यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व समतेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. न्यू उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शादाब अहमद यांनी आलेले प्रमुख पाहुणे पो. नि. मुरलीधर कासार यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी जिकरा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक समीउर रहेमान, नदिम शेख, शिरीन शेख, शिक्षक पटेल, मो. सादीक, जहिर खान, शेख अजहर, यांच्या सह शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम