जिल्हा नियोजन समिती 27 जानेवारी रोजी बैठक
जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या प्रारूप आराखड्यास मिळणार मान्यता
जिल्हा नियोजन समिती 27 जानेवारी रोजी बैठक
जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या प्रारूप आराखड्यास मिळणार मान्यता
जळगाव प्रतिनिधी
पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीत मागच्या इतिवृत्तास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या पुनर्विनियोजना प्रस्तावास मान्यता देणे इत्यादी विषय असणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम