
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर
मुंबई येथे दि.३ मार्च रोजी होणार पुरस्कार प्रदान
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर
मुंबई येथे दि.३ मार्च रोजी होणार पुरस्कार प्रदान
जळगांव प्रतिनिधी
नाशिक विभागात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना “बालस्नेही पुरस्कार- 2024” ने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे!
बालहक्क संरक्षण तसेच जळगाव जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे.
सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे दि.३ मार्च रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम मा.ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच .आदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास विभाग, योगेश कदम, राज्यमंत्री, गृह (शहरी), मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री, महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम