जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
लोकशाही दिनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
लोकशाही दिनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव,प्रतिनिधी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम