जिल्हाधिकाऱ्यांची पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट

बातमी शेअर करा...

जिल्हाधिकाऱ्यांची पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट

जळगाव,प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला नुकतीच सदिच्छा भेट देत केंद्रातील विविध प्रात्यक्षिक क्षेत्रे, प्रयोगशाळा व तांत्रिक प्रकल्पांची सविस्तर पाहणी केली

भेटीदरम्यान आदिवासी उपयोजनाअंतर्गत गारखेडा, गारबर्डी व पेपर पुणे परिसरातील आदिवासी महिला शेतकऱ्यांना परसबाग लागवडीसाठी बियाणे किटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उती संवर्धन प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, गांडूळखत प्रकल्प, मशरूम शेती व मधुमक्षिका पालन या प्रकल्पांची पाहणी करून संबंधित शास्त्रज्ञांकडून तांत्रिक माहिती जाणून घेतली.

तसेच कृषी विज्ञान करत असलेले विस्तार उपक्रम बाबत समाधान व आनंद व्यक्त केला. या विस्तार उपक्रमांची व तंत्रज्ञानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर राबवून जास्तीत जास्त नफा मिळवावा व कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

या प्रसंगी यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, दादासाहेब चौधरी, वन प्रशिक्षण संस्था पालचे संचालक हेमंत शेवाळे, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिका-यांच्या हस्ते केंद्र परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख महेश महाजन यांनी केंद्रातील कार्य, प्रकल्प व प्रदर्शनीची माहिती दिली. केळी धागा निर्मिती व इतर कृषी उत्पादनांच्या स्टॉलची त्यांनी पाहणी केली. धीरज नेहते यांनी तांत्रिक माहिती मान्यवरांना सादर केली.

गहूखेडा येथील ज्ञानेश्वर पाटील व चिनावल येथील दामिनी सरोदे यांनी कृषी उत्पादनांचे स्टॉल लावले होते. गावातील नागरिक, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज कोळी यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम