जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 80 अर्ज प्राप्त

नागरिकांना लोकशाही दिनात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बातमी शेअर करा...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 80 अर्ज प्राप्त

नागरिकांना लोकशाही दिनात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनात एकूण 80 अर्ज प्राप्त झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांचे अंतर्गत एकूण 32 अर्ज व जिल्हाधिकारी कार्यालयाचे 48 अर्ज असे एकूण 80 अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जाचे निराकरण करण्यासाठी सबंधीत विभागाचे अधिकारी उमा ढेकळे, तहसिलदार ( संजय गांधी) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकशाही दिनात तक्रारदारांची संख्या कमी होत असून नागरिकांनी लोकशाही दिनात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम