जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अजय सैंदाणे यांना प्रथम क्रमांक

बातमी शेअर करा...

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अजय सैंदाणे यांना प्रथम क्रमांक

चोपडा (प्रतिनिधी) – येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक अजय रमेश सैंदाणे यांनी जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचा व तालुक्याचा गौरव वाढविला आहे.सन्मान सोहळ्याला वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रा. अनिल झोपे यांच्या हस्ते श्री. सैंदाणे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत अजय सैंदाणे यांनी “Boosting English Writing Skills with QR Code Technology” या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे उच्च माध्यमिक गटात इंग्रजी विषयासाठी सादरीकरण केले. या उपक्रमाला परीक्षकांनी विशेष दाद देत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्रदान केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम