जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पाचोरा बास्केटबॉल क्लब तर मुलींमध्ये सेंट जोसेफ हायस्कूल विजयी

बातमी शेअर करा...

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पाचोरा बास्केटबॉल क्लब तर मुलींमध्ये सेंट जोसेफ हायस्कूल विजयी
मुलांमध्ये लवनेश पाटील तर मुलींमध्ये धनश्री पाटील सर्वोत्कृष्ठ खेळाडू

जळगाव- शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जळगाव तर्फे शुक्रवार दि. 19 सप्टेंबर 202५ रोजी सलग 5व्या वर्षी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन जी. एच. रायासोनी महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 12 मुलांच्या तर 6 मुलींच्या असे एकुण 18 संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेला मुख्य अतिथी म्हणून शिवसेना उपनेत्या तथा मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती सदस्य शितल देवरूखकर-शेठ, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय शेखावत, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे, महिला आघाडी महानगरप्रमुख मनिषा पाटील, जळगाव लोकसभा युवासेना कॉलेजकक्ष युवाधिकारी प्रितम शिंदे, महानगर युवाधिकारी संदिप सुर्यवंशी, नंदुरबार युवासेना विस्तारक कुणाल कानकाटे, मालेगावचे युवासेना जिल्हा युवाधिकारी मनोज जगताप, धुळेचे युवासेना महानगरप्रमुख सिद्धार्थ करंकाळ, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, रायसोनी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. सोनल तिवारी, क्रीडा संचालक सागर सोनवणे, मृणालिनी चित्ते, विजय राठोड, आकिब शेख, साहिल पटेल, राहूल चव्हाण, पियुष हसवाल, विजेंद्र शिरसाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
मुलांच्या संघात प्रथम स्थान पाचोरा बास्केटबॉल क्लब, द्वितीय स्थान राष्ट्रीय क्रीडा मंडळ चाळीसगाव, तृतीय स्थान जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन जळगाव तर मुलींमध्ये प्रथम स्थान सेंट जोसेफ हायस्कूल जळगाव, द्वितीय स्थान जी. एच. रायसोनी महाविद्यालय जळगाव, तृतीय स्थान जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांनी पटकावले.
उत्कृष्ठ खेळाडू म्हणून मुलांमध्ये चाळीसगाव येथील लवनेश पाटील तर मुलींमध्ये जळगावच्या धनश्री पाटील यांना पारितोषीक देण्यात आले. विजेत्या संघांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले. स्पर्धेचे तांत्रिक आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांनी पाहिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम