जिल्हास्तरीय रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न ; जळगाव संघांचे वर्चस्व

बातमी शेअर करा...

जिल्हास्तरीय रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न ; जळगाव संघांचे वर्चस्व

जळगाव : जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशन व मेजर स्पोर्ट्स क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ मिनी, १९ वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर जिल्हास्तरीय रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धा भगीरथ हायस्कूल येथे २० जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, जळगाव व एकलव्य क्रीडा संकुल येथील एकूण ८९ खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन रेमंड लाइफस्टाइल लि.चे पब्लिक रिलेशन मॅनेजर व माऊली फाउंडेशनचे संस्थापक श्री. सुनील पाटील, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे समन्वयक व विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी प्रा. प्रशांत कोल्हे, प्रा. रणजीत पाटील व क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करून करण्यात आले.

स्पर्धा ११, १४ व १७ वर्षे वयोगटांतील मुले व मुलींच्या गटांमध्ये झाली. पंच म्हणून विशाल मोरे, मंगेश कणखरे, प्रीतम मोरे, दीपक आखाडे, आनंद सोनवणे, पूर्वा महाशब्दे व लीना पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

  • ११ वर्षे मुले: प्रथम – जळगाव, द्वितीय – भुसावळ, तृतीय – रावेर

  • १४ वर्षे मुले: प्रथम – जळगाव, द्वितीय – चोपडा, तृतीय – अमळनेर

  • १७ वर्षे मुले: प्रथम – जळगाव, द्वितीय – चोपडा, तृतीय – पाचोरा

  • १७ वर्षे मुली: प्रथम – जळगाव, द्वितीय – पाचोरा, तृतीय – चोपडा

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मोहित पाटील, प्रेम सोनवणे, सूरज सपके, नवल धनगर, राजेंद्र वरांडे व लतेश सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम