
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 122 अर्ज प्राप्त
विविध विभागाचे अधिकारी उपस्थित
जळगाव,प्रतिनिधी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
मा. उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनात एकूण 122 अर्ज प्राप्त झाले. या अर्जाचे निराकरण करण्यासाठी सबंधीत विभागाचे अधिकारी उमा ढेकळे, तहसिलदार ( संजय गांधी), नायब तहसिलदार राहुल सोनवणे, (करमणूक शाखा), तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम