
जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पब्लिक स्कुलच्या दोन्ही मुलांचा संघ विजयी
जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पब्लिक स्कुलच्या दोन्ही मुलांचा संघ विजयी
धुळे प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत *धुळे जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा* जिल्हा क्रीडा संकुल देवपूर येथे दिनांक 13 रोजी संपन्न झाल्या. त्यात 14 वर्ष आतील मुलांच्या अंतिम सामन्यात हस्ती पब्लिक स्कूल संघास पराभूत करत *छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाळ संघ विजयी झाला*
तसेच 17 वर्ष आतील मुलांच्या अंतिम सामन्यात एम.आर.पटेल तांडे शिरपूर संघास पराभूत करत *छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाळ संघ विजयी झाला.
दोघी संघ धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करत विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सुभाष दादा देवरे, प्रकल्प समन्वयक एस. बी. पाटील , शाळेचे प्राचार्य आशिष काटे यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राजेश मोरे आणि क्रीडा शिक्षक हेमराज भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम