जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचे मार्फत  HIV – AIDS विषयी जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २०२५ चे आयोजन

बातमी शेअर करा...
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचे मार्फत  HIV – AIDS विषयी जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २०२५ चे आयोजन

जळगाव : आंतरराष्ट्रीय युवा दिन देशभर साजरा केला जातो. युवावर्ग हा एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशिल असून त्यानिमित्ताने युवावर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग हा सृजनशील असल्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्याच्यात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२५ चे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात युवापिढीमध्ये एचआयव्ही/एड्स विषयी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उददेशाने जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव व ऑथलेटिक असोसिएशन, जळगाव यांचे संयुक्त विदयामाने दि.०१/०८/२०२५  रोजी सकाळी ७.३० वाजता सागर पार्क, जळगाव येथे मॅरेथॉन स्पर्धा १७ ते २५ वयोगातील महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थीनी करिता आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये ऑनलाईन प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आला होता. सदर मॅरेथॅान स्पर्धेचा मार्ग सागर पार्क – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संभाजी नगर चौक – संत गाडगेबाबा चौक येथून युटर्न करुन संभाजी नगर – महाबळ चौक – काव्यरत्नावली चौक – सागर पार्क असा ५ किमी चा ठेवण्यात आला होता.सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थी – विद्यार्थीनी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सकाळी ८.०० वाजता स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री. राजेश जाधव उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऑथलेटिक असोसिएशन व जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचे शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. स्पर्धेच्या सुरुवातील प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन व स्पर्धेबद्दल उपस्तित विद्यार्थी – विद्यार्थीनी याना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रथम विद्यार्थी गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेस व विद्यार्थी गट परत आल्यावर विद्यार्थीनी गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेस सुरवात करण्यात आली. सदर या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक – कुलदीप छोटू पाटील (बालमोहन जुनिअर महाविद्यालय, चोपडा) – रू.२०००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – मुकेश रमेश धनगर (मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव) – रू.१५००/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक आदित्य विनोद येवले (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव) – रू.१०००/- व प्रमाणपत्र आणि विजेत्या विद्यार्थीनी गटात प्रथम क्रमांक – जानवी संजय रोझोदे (डॉ. सुनीलभाऊ महाजन कनिष्ट, महाविद्यालय, जळगाव ) – रू.२०००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – दिव्या समाधान देशमुख (जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव) – रू.१५००/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – माधुरी सुकलाल सोनवणे (मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव) – रू.१०००/- व प्रमाणपत्र ऑथलेटिक असोसिएशन, जळगाव यांचे उपस्थितीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचे हस्ते देण्यात आले. (सदर विजेत्या स्पर्धकाची बक्षिसाची रक्कम हि त्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे) व सहभागी सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी याना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम – गिरीश गडे, समुपदेशक – मनीषा वानखेडे, प्रशांत पाटील, विजय शिरसाठ, नामदेव पाटील, दिनकर तायडे, निशिगंधा बागुल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – उज्वला पगारे, सुवर्णा साळुंखे, शहर पोलीस प्रशासनातील – पोलीस निरीक्षक – पवन देसले, पोलीस कॉन्स्टेबल – महेश विसपुते, सुनील तडवी, विकास पवार, मंगल पारधी, इम्रान बेग, नरसिंग पाडवी, ऑथलेटिक असोसिएशन, जळगाव –  विजय पाटील, इक्बाल मिर्झा (पंच प्रमुख), विजय रोकडे, लिलाधर बाऊस्कर, संजय मोती, दिगंबर महाजन, भूषण पाटील, जिल्हा नियंत्रण विभागांतर्गत असलेल्या अशासकीय संस्थेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम