
जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये अन्याय? – वर्षानुवर्षे एकाच टेबलावर बसलेले कर्मचाऱ्यांचे रक्षण!
जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये अन्याय? – वर्षानुवर्षे एकाच टेबलावर बसलेले कर्मचाऱ्यांचे रक्षण!
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा परिषदेत नुकतीच जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. मात्र या बदल्यांमध्ये न्यायाचा बडगा सर्वांवर समानपणे न उगारणाऱ्या धोरणाची टीका होत आहे. विशेषतः सामान्य प्रशासन विभाग वगळता इतर विभागांमध्ये काही अधिकारी आपल्या निवडक कर्मचाऱ्यांची माहिती जाणूनबुजून गुप्त ठेवल्याने त्यांची नावे बदल्यांच्या यादीत आलीच नाहीत.
जिल्हा परिषदेच्या नियमानुसार, पाच वर्षांनंतर कर्मचाऱ्यांचा विभाग बदलणे आणि तीन वर्षांनंतर कामकाजाचे टेबल बदलणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक विभागांमध्ये वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना ‘स्पेशल ट्रीटमेंट’ मिळत असल्याची टीका कर्मचाऱ्यांच्या वर्तुळातून होत आहे.
या बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी याची दखल घेऊन वास्तविक तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम