
जिल्हा पोलीस दलातून जंजीर श्वान सेवानिवृत्त
जिल्हा पोलीस दलातून जंजीर श्वान सेवानिवृत्त
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलातील कार्यक्षम आणि निष्ठावान श्वान ‘जंजीर’ याच्या सेवामुक्तीचा समारंभ मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला. या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी पो.उपनिरीक्षक देविदास वाघ, तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ संदीप परदेसी उपस्थित होते.
श्वान ‘जंजीर’चा जन्म १८ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला असून, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे त्याने तब्बल नऊ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ७ एप्रिल २०१८ रोजी त्याने जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यारंभ केला. गेल्या सात वर्षांत ‘जंजीर’ने चाळीसगाव, एमआयडीसी, भुसावळ शहर आणि इतर पोलीस ठाण्यांतील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा मागोवा घेण्यात पोलीसांना मोलाची मदत केली.
श्वान ‘जंजीर’च्या कुशल शोधकार्यामुळे अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे पोलिसांना मिळाले असून, त्याच्या कार्यकौशल्याचे सर्वत्र कौतुक झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम