
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची पुणे येथे बदली
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची पुणे येथे बदली
डॉ. रवींद्र ठाकूर यांची जळगाव येथे नियुक्ती
जळगाव : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यात येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची बदली पुणे येथे झाली असून, त्यांच्या जागी पुणे येथील जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर यांची नियुक्ती होणार आहे. याशिवाय रायगड-अलिबाग जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांची बदली जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे करण्यात आली. यवतमाळ जिल्हा माहितीअधिकारी मंगेश वरकड यांची बदली वर्धा येथे, धुळे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची बदली नाशिक येथे तर डहाणू उपमाहिती अधिकारी शैलजा पाटील यांची नियुक्ती सहायक संचालक (माहिती), मुख्यालय मुंबई येथे झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम