![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/02/jjj-1.jpg)
जिल्हा वार्षिक आदिवासी 2025 – 26 चा वार्षिक आरखडा मंजुरीसाठी बैठक
प्रा. आ. चंद्रकांत सोनावणे यांनी चोपडा तालुक्यासाठी वाढीव निधी देण्याची केली मागणी
जिल्हा वार्षिक आदिवासी 2025 – 26 चा वार्षिक आरखडा मंजुरीसाठी बैठक
प्रा. आ. चंद्रकांत सोनावणे यांनी चोपडा तालुक्यासाठी वाढीव निधी देण्याची केली मागणी
ना. अशोक उईके ( आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावपाटील ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , आमदार अण्णासाहेब प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे , आमदार अमोल जी जावळे , सचिव विजय वाघमारे , उपसचिव वसावेसाहेब ,जिल्हाधिकरी आयुष प्रसाद , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार , उपस्थित होते यात आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी
१)वनविभाग , 2) मागासवर्गीय कल्याण 3)आरोग्य विभाग , ४)महिला व बालविकास (पोषण आहार ) , ५)लघु पाटबंधारे विभाग , ६)विद्युत विभाग , ७) मेडा (महाऊर्जा ) , ८ )रस्ते , ९)शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद , १०)क्रीडा व युवक कल्याण , ११)कामगार १२) कामगार कल्याण , १२)पाणीपुरवठा व स्वच्छता या सर्व बाबींवर ३६ कोटी १९ लाख रुपये वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली
तसेच आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी पुढील अतिरिक्त मांडलेले विषय
१)सन २०१३ पासून रखडलेल्या कजाऀणे ३३ के. व्ही. उपकेंद्रासाठी निधीची तरतूद करावी
२)कर्जाणे – धवली पुलासाठी निधीची तरतूद करावी निधी अभावी काम सुरू झाले नाही तात्काळ निधीची तरतूद करावी
३) चोपडा येथे आदिवासी वस्तीगृहासाठी निधी मंजूर करावा
४) आदिवासी विद्यार्थ्यांना दजेदार व गुणवत्ता वाढीस चालना मिळण्यासाठी वैजापूर येथे एकलव्य इंग्रजी माध्यम शाळा मंजूर करावी
५) शबरी माता घरकुल योजनेचा इंष्टा़क वाढवून देण्यात यावा .
तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चोपडा तालुक्याचे आ. प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी चर्चा केली व वाढीव निधी देण्यात यावा यासाठी मागणी केली
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम