
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा
जळगाव, दि. 29 जून (प्रतिनिधी) – जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने “राष्ट्रीय सांख्यिकी दिन” दि. 29 जून, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला.
भारत सरकारने प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 जून हा दिवस “सांख्यिकी दिन” म्हणून घोषित केला असून, त्यांच्या सांख्यिकी व आर्थिक नियोजन क्षेत्रातील योगदानाचा गौरव या दिनाच्या माध्यमातून केला जातो.
सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश सामाजिक-आर्थिक विकासात आकडेवारीच्या भूमिकेची जाणीव निर्माण करून विशेषतः तरुण पिढीमध्ये जनजागृती घडवून आणणे हा आहे.
कार्यक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. मनोज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. राहुल इधे होते.
कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सांख्यिकी अधिकारी श्री. समीर भालेराव यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार त्यांच्याच हस्ते करण्यात आला.
यावर्षी भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत “75 years of National Sample Survey” ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती.
कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा मानव विकास कार्यालयाचे सहायक संशोधन अधिकारी श्री. नितीन पाटील तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे श्री. विनोद घुले, श्रीमती शोभा जाधव, श्री. हर्षल चौधरी, श्री. भैरवसिंग पाटील, श्री. रितेश वैष्णव, श्रीमती कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता श्री. समीर भालेराव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
—

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम