जिल्ह्यात ठिक ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय 'नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर'

बातमी शेअर करा...

जिल्ह्यात ठिक ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय ‘नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’
जळगाव प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी, 2025 रोजी संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व जिल्हास्तरावर 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय ‘नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ असा होता.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रीय मतदार दिवस आर्ट्स , सायन्स आणि कॉमर्स कॉलेज , धुळे रोड , चाळीसगाव येथे साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, डिस्ट्रिक्ट आयकॉन डॉक्टर मीनाक्षी निकम, तहसीलदार प्रशांत पाटील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम साजरा झाल्यानंतर राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.

तसेच मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जनजागृती विषयाचे अनुषंगाने पथनाट्य, वकृत्व,रांगोळी स्पर्धा आयोजित करून बक्षीस वितरण समारंभचा कार्यक्रम संपन्न झाला. जामनेर विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रीय मतदार दिवस अनुषंगाने आज कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थित मतदारांना शपथ देण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण कामकाज उत्कृष्ट केलेबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गौरविण्यात आले आहे. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

रावेर विधानसभा मतदार संघाचा मतदार दिवसाचा मुख्य कार्यक्रम व्ही.एस.नाईक महाविद्यालय येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला होता. तसेच महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, धावणे, पोस्टर तयार करणे यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कार्यक्रमाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच बी एल ओ चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मतदार दिवसाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमात २ राज्यशास्त्राचे प्राध्यापक यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच तहसीलदार कापसे व रावेर तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार व सर्व कर्मचारी, विद्यार्थी मतदार दिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम