
जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव : राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश मंगळवार दि. २७ मे रोजी काढण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन निरीक्षकांचा समावेश आहे.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची मुंबई शहर येथे तर जिल्हा जात पडताळणी समिती येथे कार्यरत असलेले सागर शिंपी यांची जिल्हा पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. या सोबतच भडगावचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना एक वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम